शिवसेनेत जोरदार ‘इनकमिंग’ सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार इनकमिंग सुरू असून भाजपचे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी, वसई– विरार संपर्कप्रमुख अजय देसाई यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, विधानसभा संघटक वांद्रे (प.) व माजी नगरसेवक बाळा चव्हाण आणि युवती विभाग अधिकारी वांद्रे (प.) व नाशिक शहर विस्तारक ममता चव्हाण उपस्थित होते.