बॉलीवूडमध्ये अजयची 30 वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बॉलीवूडचा सिंघम’ अजय देवगणला आज सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण झाली. अजयचा ‘फूल और काँटे’ हा पहिला चित्रपट 22 नोव्हेंबर 1991 रोजी प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने अनेक बॉलीवूड कलाकार, चाहत्यांनी अजयला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर अजय देवगणसोबतचा ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला की, ‘मला अजूनही आठवतंय की, जेव्हा आपण नवीन होतो तेव्हा तू आणि मी एकत्र जुहू बीचवर मार्शल आर्टचा सराव करायचो आणि त्यावेळी तुझे वडील आपल्याला प्रशिक्षण द्यायचे. काय दिवस होते ते!  ‘फूल और कांटे’ प्रदर्शित होऊन 30 वर्षे झाली आहेत. वेळ किती वेगाने जातो. आपली मैत्री मात्र अशीच अखंडित राहू दे.