वरळीमध्ये जंगी, भव्य सभा झाली! अजित पवारांनी उडवली मिंधे गटाची खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटाची मंगळवारी वरळीमध्ये सभा झाली. कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या या मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मैदान रिकामे राहिले आणि मिंध्यांचा पुरता फियास्को झाला. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

वरळीमध्ये जंगी सभा झाली, भव्य सभा झाली. मी पण पाहिली, माध्यमांनी पण दाखवली. सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा झाली. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी वरळी येथे झालेल्या सभेची खिल्ली उडवली.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला लोकांचा प्रतिसाद, काहींना बघवत नाही!

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला लोकांचा तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, पण काहींना बघवत नाही, असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची वैजापूर येथे सभा सुरू असतानाच सभास्थानी उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. या जमावाला मिंधे गटातील स्थानिक आमदार बोरनारे यांनी भडकवल्याचा संशय आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता लोकांसाठी काम करायचे असते, असा रडीचा डाव खेळायचा नसतो. महाराष्ट्रातील लोकांना हा रडीचा डाव आवडत नाही. जे कुणी असे करत आहेत, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आमच्या पक्षातील लोकांनी देखील असे केले तरी त्याचे समर्थन मी करणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

…तर तो निकालही आमच्या बाजूने लागला असता

कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. महाविकास आघाडीचा विद्यमान आमदार असल्यामुळे म्हात्रेंना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकले नाही. नाहीतर तोही निकाल आमच्याबाजूने लागला असता, असेही अजित पवार म्हणाले.