मराठमोळ्या आकांक्षा तांबडकरची झेप, राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी झाली निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

64व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी भवन्स हजारीमल सोमाणी कॉलेज, चौपाटीची विद्यार्थिनी आकांक्षा विजय तांबडकर हिची निवड झाली असून ती सिकर्ह मार्शल आर्ट या खेळ प्रकारात महाराष्ट्र संघातून खेळणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, लातूर यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा, संजीवनी महाविद्यालय, चापोली, लातूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत आकांक्षा हिने 19 वर्षांखालील मुली या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. आता तिची दिल्ली येथे होणार्‍या 64 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा 2 ते 9 जानेवारी 2019 यादरम्यान नवी दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे संपन्न होईल.

आकांक्षाचे तिच्या या यशाबद्दल भवन्स हजारीमल सोमाणी कॉलेज, चौपाटीचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. व्ही. राठोड, ज्यु. कॉलेज उपप्राचार्या मारिया डिसिल्वा, पर्यवेक्षक अनिता तांबे, क्रीडा शिक्षक मुकेश बडगुजर व शैलेंद्र बोरकर तसेच सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.