
अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रकरणात अटक केलेल्या सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी याच्या सील घराच्या झडतीत आज दीड कोटींच्या रोकडीसह 40 तोळे सोने एवढे घबाड सापडले.
या भ्रष्ट अधिकाऱयाला दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक केली होती. विशेष म्हणजे जळगाव एसीबीने हे घर सील केल्यानंतर चौधरींच्या नातेवाईकांनी हे घर पह्डण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांमुळे घरपह्डी टळली होती. याच घरात आता जळगाव एसीबीला मोठे घबाड गवसले आहे. किरण चौधरी यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.




























































