तीन वर्षाच्या चिमुरडीवर 70 वर्षाच्या वृद्धाचा बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अकोला

खेळण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला घरात बोलावून तिच्यावर एका 70 वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची भयंकर घटना अकोला येथे घडली आहे. पीडीत मुलगी रडत घरी आल्याने तिच्या आईला संशय आला. त्यानंतर मुलीने शेजारील आजोबांनी आपल्याला त्रास दिल्याचे घरच्यांना सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडीत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून पीडीत मुलीच्या शेजारी राहतो. यामुळे दोन्ही कुटुंबांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. रविवारी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला व तिला तिच्या घराबाहेर आणून सोडले. त्यानंतर मुलगी रडत घरात गेली. मुलगी रडत असल्याचे बघून तिच्या आईला संशय आला व तिने तिला रडण्याचे कारण विचारले. त्यावर मुलीने झालेल्या घटनेबदद्ल आईला सांगितले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेत. आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.