अक्षयचा नवा लूक कुटुंबाला नाही आवडला, बेअर ग्रिल्सनेही सांगितला त्याचा किस्सा

2161
akshay-kumar-huma-instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारदेखील लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर शो ‘इनटू द वाइल्ड’ मध्ये दिसणार आहे. अक्षयबरोबर शोचा होस्ट बेअर ग्रिल्ससुद्धा दिसणार आहे. अलीकडेच अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह कार्यक्रमात या शोबद्दलची माहिती दिली.

या लाईव्ह कार्यक्रमात हुमा कुरेशी आणि बेअर ग्रिल्स हे देखील अक्षयसोबत दिसले. या कार्यक्रमादरम्यान हुमाने अक्षयला अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले. हुमा अक्षयलाही विचारते, बेअर ग्रिल्स त्याला हत्तीच्या विष्ठेशी संबंधित काहीही खाण्यास कसे काय तयार केले?

यावर बोलताना अक्षय म्हणाला की, मला फारसा त्रास झाला नाही. कारण आयुर्वेदिक कारणांमुळे मी गोमूत्रही प्यायले आहे. त्यामुळे फारशी अडचण वाटली नाही. गोमूत्र सेवनाबद्दल अक्षय ज्या सहजतेने सांगितले, त्यावर प्रतिक्रिया देताना बेअर म्हणाला की, तुम्हीच आहात जे गोमूत्र प्राशन करणे सहज असल्याचे सांगत आहात.

या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमार वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याने मिशा वाढवल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा अक्षयला यासंदर्भात विचारले गेले तेव्हा एका नव्या चित्रपटासाठी या मिशा वाढवत असल्याचे त्याने सांगितलं. तो म्हणाला की या चित्रपटासाठी माझ्याकडे बनावट मिश्या वाढवण्याचा पर्याय होता. पण मी खरी मिशी वाढवण्याचा पर्याय निवडला. अक्षय म्हणाला की, माझ्या कुटुंबाला माझा हा लूक फारसा आवडलेला नाही. त्याचवेळी बेअरने ही आपला अनुभव सांगितला. त्याने देखील मिशा वाढवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही कल्पना त्याच्या कुटुंबीयांनाही आवडली नव्हती.


View this post on Instagram

@beargrylls @iamhumaq @discoveryplusindia @discoverychannelin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

आपली प्रतिक्रिया द्या