बिग बॉस मराठीच्या घरातून अक्षय वाघमारे झाला एलिमिनेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचे पहिले एलिमिनेशन आज पार पडले. प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे हा कमी मतं मिळाल्याने घरातून बाहेर पडला आहे. अक्षय सोबत अभिनेत्री सुरेखा कुडची या शेवटच्या दोघांमध्ये होत्या. मात्र अक्षयला त्यांच्यापेक्षा कमी मतं मिळाल्याने त्याला घरातून बाहेर पडावे लागले.

या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन राऊंडमध्ये विशालने अक्षयचा फोन चार्जिंगला न लावल्याने अक्षय नॉमिनेट झाला होता. अक्षय सोबत सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, दादूस, विशाल निकम, स्नेहा वाघ हे देखील नॉमिनेट झाले होते. अक्षय हा घरात जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ व गायत्री दातार सोबत एका ग्रुपमध्ये होता. मात्र त्या ग्रुपचा असूनही त्याचे इतर सदस्यांशी देखील चांगले पटायचे. अक्षयचे दोन तीन वेळा विशाल निकम सोबत वाद झाले. मात्र तरिही ते दोघे काही वेळाने एकत्र यायचे.

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर अक्षयने घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा तो म्हणाला, “मी सर्वात जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस कारेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये रहाण खूप कठीण आहे. मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळालो”.

बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.