दारुड्यांना होतो डासांचा सर्वाधिक त्रास, का ते वाचा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

डासांचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या चावण्याने झालेला वैताग ही खरंतर खूप सामान्य बाब. मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया अशा भयंकर रोगांना निमंत्रण या डासांमुळे मिळतं. सामान्यतः निर्व्यसनी माणसाला इतकं हैराण करणारे डास दारुड्यांना मात्र त्याच्या दुपटीने चावतात, असं वैद्यकीय परीक्षणात निष्पन्न झालं आहे. गंमत म्हणजे दारुड्या माणसाला चावणाऱ्या डासांवर दारूचा काहीही परिणाम होत नसल्याचंही समोर आलं आहे.

लंडन, अमेरिकासारख्या देशांनी डासांच्या चावण्यावर विविध संशोधन केलं आहे. त्या संशोधनात त्यांना डासांच्या या सवयीचा शोध लागला. सामान्यतः डास हे फळांचा रस शोषतात. पण, त्यातील मादी डास मानवी रक्त पिते. याचं कारण रक्तातून मिळणारी प्रथिनं तिला अंडी घालण्यासाठी उपयुक्त असतात. पण, आसपास मानवी अस्तित्व असल्याचं डासांना कसं कळतं? या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. माणसाच्या उच्छवासात असलेला कार्बन डायऑक्साईड हा वायू डासांना मानवी अस्तित्वाची जाणीव करून देतात. पण, याखेरीज दारुड्या माणसांच्या रक्तात दारू प्यायल्यानंतर तयार होणारं ऑक्टोनॉल नावाचं रसायनाचा गंधही डासांना समजतो. तसंच, दारू प्यायल्यानंतर माणसाच्या घामावाटे बाहेर पडणारं इथेनॉल नावाचं रसायनही डासांना समजतं. त्यामुळे दारुड्या माणसांना डास जास्त चावतात.

असं, असलं डासांना दारू चढत नाही. कारण,10 पेग प्यायल्यानंतरही मानवी रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण 0.2 इतकं असतं. त्याचा काहीही परिणाम डासांवर होत नाही. तसंच डासांच्या पचन यंत्रणेत अल्कोहोल पचवण्याची क्षमता असते. त्यामुळे दारूड्या माणसाला चावून डास झिंगत नाही.