अजयची रोल्स रॉय कार पाहताना दिसली आलिया भट्ट, चाहते म्हणाले- रणबीरला व्हॅलेंटाइन गिफ्ट मागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajay-alia

आलिया भट्ट आणि अजय देवगण त्यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चे प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. पण अजय देवगण आणि आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट अजय देवगणच्या आलिशान कार रोल्स रॉयला आतून पाहत असल्याचे दिसून येते. या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

आलिया भट ही कार आतून मोठ्या उत्सुकतेने पाहत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अजय देवगणही तिला कारबद्दल सांगत आहे. अजय देवगणकडे एक उत्तम रोल्स रॉय कार आहे जी हिंदुस्थानात फार कमी लोकांकडे आहे.

अजय देवगण आणि आलिया भट्टच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘हे सगळे मोठे लोकही करतात?’ तर तिकडे एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘रणबीर कपूरकडून व्हॅलेंटाइन गिफ्ट मागणार आहे.’ इतकंच नाही तर आलिया भट्टने अजय देवगणला त्याच्या अॅव्हरेजबद्दल विचारलं असावं असं अनेक चाहते म्हणत आहेत. अशातच त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)