Photo- ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भट्ट पांढऱ्या फ्लोरल साडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  आपल्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्सबाबतही कायम चर्चेत असते. वेस्टर्न कपड्यांबरोबरच एथनिक कपडेही lतिला शोभून दिसतात. ती तिचे स्टायलिस्ट फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाला साडीत पाहिले जात आहे. ज्यात ती फार सुंदर दिसतेय.

आलिया भट्टने सोशल मीडियावर लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुरेख दिसत आहे. फोटोमध्ये तिने फ्लोरल पांढऱ्या रंगाचे प्रिंटेड लिनन साडी नेसली होती. यासह, तिने गुलाबी फुलांचा मॅचिंग ब्लाउज घातला आहे.

या लूकसोबत आलियाने साधासा मेकअप केला आहे. तिने डोळ्यांना काजळ, लहान टिकली आणि केसांमध्ये पांढऱ्या रंगाची गुलाबाची फुले माळली आहेत. त्याच वेळी, तिने दागिन्यांमध्ये चांदीचे झुमके घेतले होते.

आलियाचा हा साधा लूक चाहत्यांना भावला असून तिच्या फोटोचे कौतुकही करत आहेत. आलियाच्या या सुंदर साडीची किंमत 22 हजार रुपये आहे.

आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून प्रमोशनला जाताना पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसून आली आहे.

आलियाने येथे पांढर्‍या रंगाच्या लाइट वेट साडीसह गोल्डन बॉर्डरसह व्हिशेप डीप नेक ब्लाउज कॅरी केला आहे, जो खूपच स्टायलिश दिसत आहे. तर गळ्यात कानातले घातले आहेत आणि केस मोकळे ठेवले आहेत.