
अखिल भारतीय मातंग संघ बी गट आणि सर्व समाजाच्यावतीने बी. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गायराण पट्टेधारकांचा धडक मोर्चा सोमवार, 12 जुलैला दुपारी 1 वाजता जालना जिल्ह्यातील आंबडमधील एचडीएम उपविभागीय कार्यालयावर काढण्यात येणार आहे. अनेक वर्षे दलित बहुजन मातंग समाजाचे कामगार, शेतकरी गायराण पट्टे कसत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन जमिनीचा 7-12 या कसणाऱ्या शेतकरी आणि कामगारांच्या नावावर करावा, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.



























































