उन्हाच्या भडक्यामुळे कार पेटली, अल्टो कार जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । कोपरगांव

शहरात आज भर दुपारी 3 वाजता संभाजी सर्कल जवळ डॉ. आढाव हॉस्पीटल समोरच अल्टो कारने अचानक पेट घेतला व ती कार जळुन खाक झाली. यावेळी कोपरगांव अग्नीशमन बंबाला तातडीने पाचारण करावे लागले व तातडीने आग विझवण्यात आली. गंगापूर येथील अनुराग पाटील यांनी सदर घटनेतील अल्टो कार दवाखान्याबाहेर लावून कुटूंबासह आत गेल्यानंतर पाच मिनीटातच त्यांची कार आगीच्या भक्षस्थानी पडली. कोपरगांव शहरात 41,42 अंश तपमान झाल्याने शहरातील नागरिकांच्या शरीराची अंगाची लाही लाही होत आहे. एकीकडे उष्णतेचा कहर वाढत असतांनाच उष्णतेनेच गॅसचे किट असलेल्या अल्टो गाडीने अचानक पेट घेतला व या आगीत कार पूर्णपणे जळुन खाक झाली. कारचे मालक अनुराग पाटील हे पाचच मिनीटात बाहेर येऊन पहातात. तर कारचा कोळसा झाला होता. अग्नीशमनदलाच्या बंबाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.