
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम त्यांच्या वादग्रस्त विधांनामुळे वादात अडकत असतात. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ते राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करत तसेच राजभवनाने प्रसिद्धीपत्रक काढत यासंदर्भातील माहिती दिलेली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधाने…
- छत्रपती शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधायला पाहिजेत.
- समर्थ रामदासांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? गुरूंचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं होतं.
- जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचं लग्न झालं तेव्हा ते 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा-मुलगी काय करतात.
- महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत.






























































