हिंदुस्थानच्या वाट्याला जाऊ नका, अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले आहे. तसेच पुन्हा जर हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला केला तर परिस्थिती कठीण होईल, असा गर्भित इशाराही या अधिकाऱ्याने पाकिस्तानला दिला आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. हिंदुस्थानने त्याचा बदला बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाध्यांचे तळ उधवस्त करून घेतला. पाकिस्तानने याबाबत अमेरिकेकडे तक्रार केली होती. मात्र व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्याने उलट पाकिस्तानचेच कान उपटले आहेत. आम्हाला दोन्ही देशात शांतता नांदावी असे वाटते आहे आणि त्यासाठी पाकिस्तानने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबावर कारवाई करणे गरजेचे आहे. या अगोदर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्याचं दाखवलं खरं मात्र नंतर दहशतवाद्यांना सोडून दिले.पाकिस्तानकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे असे व्हाईट हाऊसतर्फे बजावण्यात आले आहे. हिंदुस्थानवर पुन्हा दहशतवादी हल्ला केल्यास परिस्थिती  हाताबाहेर जाईल असेही या अधिकाऱ्याने पाकिस्तानला ठणकावले आहे.