9 वर्षांनंतर मराठी मालिकेत दिसणार अमित भानुशाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार प्रवाहवर 5 डिसेंबरपासून रात्री 8.30 वाजता सुरू होणाऱया ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत सायली इतकीच एक महत्त्वाची व्यक्तिरेखा अर्जुन सुभेदार यांची असेल. अभिनेता अमित भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. यानिमित्ताने तब्बल 9 वर्षांनंतर अमित मराठी मालिका विश्वात कमबॅक करतोय.

भूमिकेविषयी अमित म्हणाला, ‘या मालिकेतील भूमिका आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळी आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. तो कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. पुढे तो म्हणाला, ‘आमच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एका हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्राताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच, पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं.’