जैन धर्म म्हणजे नैतिकमूल्य आणि विज्ञानाचा मिलाफ- अमृता फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amruta-fadnavis-mulund

सामना ऑनलाईन । मुंबई

जैन धर्म म्हणजे नैतिकमूल्य आणि विज्ञानाचा सुरेख मिलाफ आहे. आज विज्ञानाच्या जोरावर आपण प्रगती करत असलो तरी दुसऱ्या बाजूला सुख-शांती मात्र हरवून बसलो आहोत, अशा काळात धर्मच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जैन धर्माविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.