प्री वेडींग फोटोशूट करत असताना हत्ती बिथरला, जोडप्याची झाली अशी अवस्था

मागच्या काही वर्षांपासून प्री वेडिंग शूटचा ट्रेण्ड वाढला आहे. आपले प्री वेडिंग बेस्ट होण्यासाठी लोकं वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. मात्र एका जोडप्याला हे प्री वेडिंग फोटोशूट करणं चांगलच महागात पडलं आहे. केरळचं हे जोडपं प्री वेडींग शुट करत असताना हत्ती बिथरला आणि पुढे झाली अशी अवस्था.

केरळच्या एका जोडप्याने प्री वेडिंग फोटोशूट करत असताना एक घटना घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये केरळचे एक जोडपं फोटोशूटसाठी छानसे पोज देत होते. अचानक मागे असलेला हत्ती बिथरला. व्हिडीओमध्ये पाहिले असेल की, हा हत्ती माहुतावर हल्ला करतो. जेव्हा हत्तीने त्याला सोंडेने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो खाली पडला. माहुत लगेच उभा राहिला आणि त्याने तिथून पळ काढला. मात्र हत्तीच्या सोंडेत माहुताचे कपडे राहिले. व्हिडीओमध्ये पुढे त्या नवरदेवाने आपला अनुभव सांगितला की त्याने अचानक लोकांचा ओरडण्याचा आवाज आखला आणि सगळे इथे तिथे धावू लागले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Wedding Mojito (@weddingmojito)

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ “@weddingmojito”या आयडीवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. अनेक युजर्सना हत्तीला मंदिरात ठेवल्याचे आवडले नाही. एका युजरने लिहीले की. व्यावसायिक उद्देशासाठी प्राण्यांचा वापर करणे. हे तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांना वाटते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्राण्याचा उपयोग करु शकतो. त्या जोडप्याचीही लाज वाटते, फार दयनीय आहे.