अभिनेत्रीचा किस घेताना पाहिल्याने अभिनेत्याचा मुलगा भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड सिनेमे दिवसेंदिवस बोल्ड होत चालले आहे. पूर्वीच्या काळी चुंबन दृश्ये दाखवण्यासाठी हिरो-हिरोईन झाडामागे लपलेले दाखवायचे किंवा दोन फुलांचा आधार घेतला जायचा. हल्लीच्या चित्रपटांमध्ये चुंबन दृश्ये सर्रासपणे दाखवली जातात. अशाच एका चुंबन दृश्यामुळे एका अभिनेत्याचा मुलगा त्याच्यावर संतापला आहे. संतापलेल्या मुलाने अभिनत्याला या चुंबनदृश्याबद्दल जाबही विचारला ज्यावर हा अभिनेता निरूत्तर झाला होता.

या अभिनेत्याचं नाव विवेक ऑबेरॉय असं आहे. कोरोना काळात त्याने आपल्या मुलांना भरपूर वेळ दिला आहे. विवेकने कोरोना काळामध्ये त्याचा मुलगा विवान आणि मुलगी अमेया या दोघांना ‘प्रिन्स’ हा त्याचा चित्रपट दाखवला. कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. सायन्स फिक्शन प्रकारात मोडणारा हा चित्रपट होता. चित्रपटात भरपूर हाणामारी दाखवण्यात आली आहे. हाणामारीवाले चित्रपट विवेकचा मुलगा विवान याला बरेच आवडतात.

विवेकने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले की त्याच्या दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच त्याचा सिनेमा पाहीला. विवेकने म्हटलंय की त्याचा मुलगा विवान याला थरारक सिनेमे आवडतात, त्यामुळे हा सिनेमा त्याला फार आवडला होता. त्याचे स्क्रिनवर खिळलेले होते. अमेया मात्र हा चित्रपट पाहून अर्ध्यातच कंटाळली होती असं विवेकने म्हटलंय. तिला सतत होणारी मारामारी पाहून कंटाळा आला होता, मात्र विवानला सिनेमा आवडल्याने त्याने तो संपू्र्ण सिनेमा स्क्रिनवरची नजर न हटवता पाहिला असं विवेक म्हणाला. मात्र चित्रपटातील एक बाब विवानला जाम खटकली होती.

विवकने सांगितलं की चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन होता. विवेक अभिनेत्रीला किस करत असताना पाहून विवान हा संतापला होता. आईऐवजी आपले बाबा दुसऱ्या कुठल्या तरी तरुणीचा किस कसा काय घेऊ शकतात असा प्रश्न विवानला पडला होता. हा प्रश्न त्याने थेट विवेकलाच विचारला. विवेकने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तो अभिनय करत होता आणि चित्रपटाचा खऱ्या जीवनाशी संबंध नसतो. मात्र विवानला हे पटतच नव्हतं असं विवेकने म्हटलंय.