खडसे मर्द असाल तर माझ्याशी न्यायालयात लढा – अंजली दमानिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

एकनाथ खडसे तुम्ही मर्द असाल तर माझ्यावर खोटे आरोप करण्यापेक्षा न्यायालयात माझ्याशी लढा, असे दमदार आव्हान बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांना केले आहे.

अंजली दमानिया पोलीस अधीक्षक कार्यालयात जबाब देण्यासाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत गजानन मालपुरे आणि रोशनी राऊत उपस्थित होत्या.

खडसे यांनी मुक्ताईनगर येथे अंजली दमानिया यांच्यासह ६ जणांविरुध्द न्यायालयातुन गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी व जबाबासाठी तेथील पो. नि. कडलग हे दोन गाड्यांच्या फौजफाट्यासह मुंबईला आले होते. पण तक्रारीचे कागद माझ्याकडे नव्हते त्यामुळे प्रमाणित प्रती घेवून अभ्यास करुन मी स्वत: पोलीस अधीक्षकांकडे लेखी जबाब घेवून आले आहे. आम्ही दोषी आढळल्या पोलीसांनी आम्हाला तत्काळ अटक करावी. आम्ही जामिनसुध्दा घेणार नाही. दोन डी. डी. चोरीचे आहेत असे खडसे म्हणतात मग त्या बँकेने डी. डी. चोरी प्रकरणी तक्रार का दाखल केली नाही. खडसे यांनी न्यायालयाची दिशाभूल करुन न्यायाल्याच्या माध्यमातुन गुन्हा दाखल केला. आ. खडसे यांनी त्याच्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी करुन खडसे यांना निलंबीत करावे यासाठी विधानसभा सभापती व उच्च न्यायालयात ९ जुलै रोजी अर्ज करणार आहे. भुजबळ आणि खडसे यांच्या विरुध्द मी लढत आहे. खडसे आणि भुजबळ एकत्र येणार आहेत. त्यामुळे दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी एकत्र आले तरी त्यांना पुरुन उरणार आहे.

मुख्यमंत्री खडसेंना घाबरत असावेत
मुख्यमंत्री फडणवीस खडसेंना घाबरत असावे किंवा खडसेंनी पक्ष सोडून जावू नये किंवा जळगाव जिल्ह्यातील मते फुटु नये म्हणून त्यांनी खडसेंना क्लीनचिट दिली असावी. मी मनिष भंगाळे नाही. माझ्या विरुध्द २२ खटले दाखल करण्यात आले आहे. अजामिनपात्र दोन वारंट काढण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिलेला अहवाल सादर केला त्याविरुध्द अर्ज सादर केला आहे.

गिरीश महाजनांवर देखील राग
एकनाथ खडसे म्हणतात दमानिया या प्यादा आहेत यामागे एक मंत्री आहे. याचा त्यांनी समाचार घेतांना जेवढा राग खडसेंबद्दल आहे तेवढाच राग या जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या बद्दल आहे. एस.टी. महामंडळाच्या जमीनीचा मोठा गट पांझरपोळ संस्थेला देण्यात आला. जमीनीचा गट खटोड यांना देण्यात आला. त्यातील काही भूखंड साधना महाजन यांच्या नावावर तर ५ भूखंड अ‍ॅड.रोहिणी खडसेंच्या नावावर असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना रवी पुजारी यांचे फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिली.