
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक रोमँटिंक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुष्का शर्मानेच हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ केला आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला असून ‘जगातील सर्वात शानदार आणि बेस्ट कपल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अनुष्काने शेअऱ केलेल्या या फोटोत अनुष्का विराटच्या गळ्यात पडलेली दिसत आहे. विराटनेही प्रेमाने तिला मिठी मारली आहे. दोघांचाही चेहरा प्रेमाने ओसंडून वाहताना दिसत आहे. या फोटोसोबत अनुष्काने एक कॅप्शन दिले असून विराटबाबत आपल्या भावाना व्यक्त केल्या. ‘तू मला सर्वाधिक आनंदी मुलगी बनवतोस’, असे कॅप्शन अनुष्काने दिले आहे.
विरुष्काच्या या फोटोला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. इन्स्टाग्रामवर या फोटोला 2 कोटी 79 लाख 733 लोकांनी लाईक केले असून जवळपास 14 हजार लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिला आहेत.


























































