एप्रिलमध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे विक्रमी जीएसटी संकलन 

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. देशांतर्गत व्यवहार 13.4 टक्क्यांवर आणि आयातीमधील 8.3 टक्क्यांच्या  मजबूत वाढीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 12.4 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसली. परतावे दिल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल संकलन 1.92 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.1  टक्क्यांची वाढ दर्शवते.