अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन

609

अरबी समुद्रात काहीसे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दोन दिवस ढगाळ स्थिती कायम असून काही ठिकाणी अवकाळी स्वरूपात पाऊस पडत आहे. समुद्रात अधिक वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यांचा वेग वाढण्याचीही स्थिती आहे. तरी बुधवार 4 डिसेंबर रोजी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. अशा सूचना हवामान विभाग, मुंबई यांनी दिल्या आहेत. तरी सिंधुदुर्गातील मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये दक्षता घ्यावी. असा संदेश मत्स्यव्यसाय विभाग सिंधुदुर्ग यांनी दिला आहे.

महिनाभरापूर्वी समुद्रातील वादळानी मोठे नुकसान केले असताना पुन्हा एकदा खराब हवामानाचा फटका मालवणसह सिंधुदुर्गातील पर्यटन व मासेमारी व्यवसायाला बसण्याची स्थिती आहे. एकूणच पर्यटनात मंदीची स्थिती असताना खराब हवामानामुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प होईल. मत्स्य दुष्काळाच्या झळा सोसणारा मच्छिमार बांधवही चिंतातुर बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या