रोमॅण्टिक बॅण्ड-एड

758

बॅण्ड-एडमुळे किटाणू आणि अन्य संसर्गापासून जखमेचे संरक्षण होते हे खरे, पण हे बॅण्ड-एड नेमके तयार कसे झाले त्यामागची रोमॅण्टिक गोष्ट…

धावताना पडलो किंवा साधं खरचटलं तरी आपण लगेच जखमेवर बॅण्डएड पट्टी लावतो. ही पट्टी लावून आपण निर्धास्त होतो. पण ही बॅण्डएड पट्टी नेमकी बनली कशी याची माहिती आपल्याला नसते. काहीही असलं तरी ती मलमपट्टी आपल्याला बरं करते एवढं मात्र नक्की. बॅण्डएडमुळे किटाणू आणि अन्य संसर्गापासून जखमेचे आपण संरक्षण करतो. बॅण्डएड नेमके कसे तयार झाले यामागे एक रोमॅण्टिक गोष्ट आहे.

‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीत अर्ल डिक्सन नावाचे एक गृहस्थ काम करत होते. जोसेफाइन नाइट हिच्यासोबत त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. या जोडप्याचे एकमेकांकर खूप प्रेम होते. पण या जोसेफाइनला स्वयंपाकघरात काम करताना सारखी जखम व्हायची. ती साफसफाई करत असेल किंवा असताना अगदी स्वयंपाक करतानाही तिला काहीतरी लागून ती जखमी होत असे. खरी गंमत तर यापुढेच आहे. कारण काम करताना तिच्या जखमेवर लावलेले कुठलेही औषध टिकत नसे. यामुळे दुःखी झालेल्या डिक्सनला एक कल्पना सुचली. त्याने चौकोनी चिकटपट्ट्या तयार केल्या. त्याकर त्याने गॉज आणि औषध लावले. याप्रकारे एक अशी पट्टी तयार झाली जी जोसेफाइनला कुठेही जखम झाली की लगेच तो त्यावर लावायचा. डिक्सनने अशा मग अनेक पट्ट्या तयार करून ठेवल्या. ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीला त्याच्या या पट्ट्यांबद्दल समजलं. या पट्ट्या अर्ध्या सेकंदात लावता येतात हेही त्यांना कळलं. त्यांनी लगेच ही संकल्पना अमलात आणली.

जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीने बॅण्डएड बाजारात आणले तेव्हा लोकांना ते खूपच आवडले. ही बॅण्ड-एड पट्टी हातोहात विकली जाऊ लागली. त्यानंतर म्हणजे 1924 साली कंपनीने डिक्सनला कंपनीचा उपसंचालक बनकले आणि त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्येही स्थान मिळाले. त्या दरम्यान बॅण्ड-एड पट्टी जगभरात पसंत होऊ लागली.

काय आहे बॅण्ड-एड…

  • इतर बॅण्डेजसारखी ही पट्टी नुसती बांधायची नसते, तर जखमेवर चिकटवायची असते.
  • जखमेवर ही पट्टी लावली की किटाणू जखमेत शिरत नाहीत.
  • काहीवेळा पॉलीमरचा वापर करूनही बॅण्ड-एड पट्टी बनवली जाते. त्यासाठी हायड्रोजेल्स वापरतात. हे जेल कडुलिंब आणि ऍलोव्हेरा वगैरे हर्बल उत्पादनांनी बनवतात.
  • शुगर पेसेंट्ससाठी बॅण्ड-एड पट्टी उत्तम असते.
  • बॅण्ड-एड पट्टी लावल्याने जखम लवकर भरून येते.
  • जखम झाल्यावर लगेच त्यावर औषध लावता येत नाही. अशावेळी ही पट्टी विषाणू जखमेपासून दूर ठेवण्याचे काम करते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या