
>> शब्दांकन : निनाद पाटील
आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात ज्यांच्या सहवासामुळे आपली आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदलते किंवा समृद्ध होते. अशा दोन व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या त्या म्हणजे स्मिता तळवलकर आणि सूरज बडजात्या! सांगताहेत मराठी-हिंदी मालिकांच्या लेखिका रोहिणी निनावे.
माझी आई वारल्यानंतर मनामध्ये एक उदासीनता निर्माण झाली होती. त्याचदरम्यान मला स्मिता तळवलकरांबरोबर काम करण्याचा योग आला. स्मिताताईंबद्दल खूप काही ऐकलं होतं, खूप आदर होता. उत्सुकता ही होती की, ही बाई कशी असेल, पण आम्ही अशा काही भेटलो, जणू काही खूप जुनी ओळख असावी. काही लोकांशी आपले सूर सहजच जुळतात आणि नात्याची एक सुरेख ‘सरगम’ तयार होते… तसंच झालं. त्यांचा मायेचा, आपुलकीचा पदर इतका मोठा होता की, त्यात खूप जण सामावले होते. अतिशय मायाळू, बहुश्रुत हुशार स्मिताताई. आम्ही बरोबर खूप काम केलं. त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यातील ऊर्मी ही खरंच खूप काही शिकवणारी होती.
आयुष्य भरभरून कसं जगावं हे तिच्याकडून शिकावं. कुठलाही प्रश्न आला, समस्या आली तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना चांगलंच माहीत होतं. त्या मला नेहमी म्हणायच्या, सगळय़ा लोकांची आणि सगळय़ा गोष्टींची मोट कशी बांधायची ना, याची युक्ती माझ्याकडे असते म्हणून कुङ्गलीही गोष्ट मला संकट वाटत नाही. सगळय़ा गोष्टीतून काही ना काही मार्ग हा निघतोच.
देणाऱयाने देत जावे असं त्यांचं तत्त्व होतं आणि त्यांनी खूप जणांना खूप काही दिलं, मदत केली, दिलासा दिला, विश्वास दिला, संधी दिली.
‘अवंतिका’च्या शूटिंगच्या वेळेला त्यांच्या घरीच कलाकार राहत. त्या स्वतः पदार्थ बनवून कलाकारांना खाऊ घालत.
पुढे त्यांना पॅन्सर झाला, पण त्या हरल्या नाहीत, त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या पुन्हा काम करायला लागल्या. तोच उत्साह, तीच नवीन काहीतरी करण्याची आस. दुर्दैवाने त्या हे जग सोडून गेल्या तेव्हा मी हिंदुस्थानात नव्हते. शेवटची भेट झाली नाही, पण जाताना आशेचा प्रसाद हातावर ङ्खेवून गेल्या आणि सकारात्मक रहा हा आशीर्वादसुद्धा!
आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपण निराश होतो. माणसं आपल्याशी चांगली वागेनाशी होतात आणि मग चांगुलपणावरचा आपला विश्वास उडतो. जगात चांगल्या मनाची माणसं नाहीतच का, असा प्रश्न आपल्याला पडतो. अशाच एका वळणावर चित्रपट दिग्दर्शक-निर्माते सूरज बडजात्या यांच्याशी भेट झाली कामानिमित्त. त्यांचे अनेक चित्रपट पाहिले होते. त्यांना प्रत्यक्ष भेटायची, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही पर्वणीच होती. अत्यंत मृदुभाषी, शांत, हुशार असे व्यक्तिमत्त्व.
इतपं नाव मिळवलं असून अत्यंत साधे. ज्या निवडक लोकांनी मला मालिका लेखनाचे तंत्र आणि मंत्र सांगितले त्यापैकी सूरजजी एक आहेत. साधाच सीन कसा इंटरेस्टिंग बनवता येईल हे त्यांनी मला सांगितलं, पण सांगताना कुङ्गेही शिकवण्याचा आविर्भाव नव्हता. बऱयाच लोकांमध्ये जी गोष्ट नसते ती गोष्ट त्यांच्यात आहे, ती म्हणजे चांगल्या गोष्टी ऑप्रिशिएट करणं. कथा लिहिताना एखादी घटना, एखादा संवाद चांगला लिहिला गेला तर वेळात वेळ काढून पह्न करून किंवा मेसेज करून दाद देतात. ही गोष्ट त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखी आहे.
आणखी एक गोष्ट मला आङ्गवते, त्या काळात सातत्याने लिहीत असल्यामुळे माझा हात सुजून जायचा आणि जड लॅपटॉप उचलायला मला त्रास व्हायचा. तेव्हा ते म्हणायचे की, ‘‘रहने दीजिये रोहिणीजी. मैं लॅपटॉप उङ्गा लेता हूं.’’ तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि काwतुकही. एवढा मोङ्गा माणूस आणि किती साधा आहे! जशी माणसं त्यांच्या चित्रपटात असतात तसेच ते स्वतःही आहेत आणि हे सगळं करताना कुङ्गेही अभिनिवेश नाही, दिखाऊपणा नाही, अहंकार नाही. बोलताना कोणाचा अवमान नाही, कुणाबद्दल अपशब्द नाही. खूप काळजी घेणारी, आपल्या माणसांना जपणारी अशी ही व्यक्ती. जिच्यामुळे जगात चांगली माणसे पण आहेत यावर पुन्हा विश्वास बसला.
स्मिता तळवलकर आणि सूरज बरजात्या या दोघांनी मला आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला.



























































