
>> प्रा. वर्षा चोपडे
मानवजातीला संदेश देण्यासाठी आणि लोकांमध्ये एकता वाढवण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. स्वातंत्र्य आणि न्यायाच्या विचारसरणीशी लढा देण्यासाठी 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. दहशतवाद विरोधी दिन हिंदुस्थानातील लोकांचे रक्षण करण्यासाठी दहशतवादाविरुद्ध लढलेल्या हजारो सैनिक आणि सुरक्षा जवानांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस आहे.
आपल्या देशात विविध धर्मांचे आणि विविध पंथांचे लोक राहतात. आपला संपूर्ण हिंदुस्थान एका कुटुंबासारखा आहे. आपले सुप्रसिद्ध कवी इक्बाल यांनी लिहिलेल्या, ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना’ या ओळी बराच काही संदेश देतात. देशाच्या विरोधात असलेल्या राज्य यंत्रणेचा भाग नसलेल्या गटांना माध्यमांमध्ये ‘दहशतवादी’ म्हणून संबोधले जाते. एक युक्ती किंवा तंत्र ज्याद्वारे हिंसक कृत्याचा वापर जबरदस्तीच्या हेतूंसाठी, भीती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी केला जातो. ‘दहशतवादी’ आणि ‘दहशतवाद’ या शब्दांचा उगम 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच राज्पांतीदरम्यान झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणावर वापरला जाऊ लागला. 1970 च्या दशकात उत्तर आयर्लंडमधील समस्या, बास्क संघर्ष आणि इस्रायली- पॅलेस्टिनीने जगभर लक्ष वेधले. 1980 पासून आत्मघातकी हल्ल्यांचा वाढलेला वापर अमेरिकेमधील 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यांद्वारे दर्शविला गेला. जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, इस्रायल, इंडोनेशिया, हिंदुस्थान, स्पेन, जर्मनी, इटली आणि फिलिपिन्स या लोकशाही देशांनी देशांतर्गत दहशतवादाचा अनुभव घेतला आहे.
21 मे राजीव गांधी पुण्यतिथी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ 21 मे हा राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. राजीव गांधी हे हिंदुस्थानचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. देशाचे सहावे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि 1984 ते 1989 पर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. 21 मे 1991 रोजी राजीव गांधींची मानवी बॉम्बने हत्या झाली. देशात कॉम्प्युटरची ाढांती आणणारे महान पंतप्रधान आपण या दिवशी गमावले. त्यानंतर व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात केंद्राने 21 मे हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.
गरीब, सनकी मुलांना पैशाचे आणि धार्मिक आमिष देऊन ब्रेनवॉश केला जातो आणि सरकारविरोधी कुरापती करण्यास भाग पडले जाते. हा नैतिकदृष्टय़ा चुकीचा मार्ग अनेक निष्पाप लोकांचे जीव घेऊन जातो. प्रत्येक धर्माचा माणूस याला बळी पडतो. दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो. ही केवळ हिंदुस्थानातील समस्या नाही, तर जगभरात हा भयंकर रोग पसरला आहे. शिक्षण आणि उत्तम रोजगार यावर उपाय आहे, पण लोकसंख्या नियंत्रणात असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान आणि सहकार्य जरुरी आहे. बालमनात संस्कार आणि देशप्रेमाची बीजे रुजवणे अत्यावश्यक आहे.
टास्क फोर्सने दहशतवादाची व्याख्या केली आहे ती अशी की, ‘एक युक्ती किंवा तंत्र ज्याद्वारे हिंसक कृत्य किंवा त्याच्या धोक्याचा वापर जबरदस्तीच्या हेतूंसाठी जबरदस्त भीती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी केला जातो,’ अशी केली आहे. सिव्हिल डिसऑर्डर, राजकीय दहशतवाद, गैर-राजकीय दहशतवाद, धार्मिक अतिरेकी दहशतवाद, धार्मिक कट्टरतावादी दहशतवाद अशा अनेक दहशतवादांचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, कॉलेज पार्कच्या ग्लोबल टेररिझम इंडेक्सनुसार, धार्मिक अतिरेक्यांनी राष्ट्रीय फुटीरतावादाला मागे टाकले आहे. 2001 पासून सर्वाधिक सािढय असलेले पाच दहशतवादी गट म्हणजे हमास, बोको हराम, अल-कायदा, तालिबान आणि इसिस घ्एघ्थ्. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नायजेरिया आणि सीरियामध्ये हे गट सर्वाधिक सािढय आहेत. दहशतवादामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू या पाच देशांपैकी एका देशात झाले आहेत. अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, बेल्जियम, स्वीडन यांसारख्या गैर-मुस्लिम बहुसंख्य देशांवरही याचे भयंकर पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानमध्ये दहशतवाद ही मोठी समस्या बनली आहे.
हिंदुस्थानातील दहशतवादाचे तीन प्रकार आहेत. जातीय दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, वैचारिक दहशतवाद. हिंदुस्थानाला जम्मू आणि कश्मीर राज्य, ईशान्य राज्ये आणि मध्य हिंदुस्थानाच्या काही भागांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला. हिंदुस्थानातही 26/11 आणि इतर अमानवीय हल्ले देश विसरलेला नाही. हिंदुस्थान सरकारने आपल्या सीमेवरील दहशतवादी कारवाया शोधण्यासाठी, विस्कळीत करण्यासाठी आणि त्यांचा ऱ्हास करण्यासाठी सतत दबाव आणला. अमेरिका आणि इतर समविचारी देशांच्या सहकार्याने देशांतर्गत दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि दहशतवादाच्या गुन्हेगारांना सजा देण्यासाठी असंख्य प्रयत्न केले.
गैरसमज, सामाजिक असमानता, राग, तिरस्कार, बिघडलेले मानसिक स्वास्थ आणि चिथावणी अतिरेकी कारवाया घडवतात. शांततेने समाधान शोधता येते हे विसरून दुसऱ्याची हत्या करणे अशा लोकांना सोपे वाटते, पण त्यानंतरचे परिणामांचा विचार मात्र केला जात नाही. देशात दहशतविरोधी अनेक कायदे आहेत. शिक्षेची तरतूद आहे हे विसरून मायभूमीला रडवणारे स्वतच्या कुटुंबाचाही विचार करत नाहीत. परदेशी अतिरेक्यांचा बंदोबस्त करायला आपली सेना समर्थ आहे, पण देशातील दहशतवादींचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असले तरी नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. ‘मेरा भारत महान’ असे म्हणून चालणार नाही तर ‘सारे जहाँ से अच्छा’ असलेल्या देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई अतिरेकी कारवाया दूर करण्यास सक्षम आहेत हे नक्की. त्यामुळे देश हा सर्वप्रथम असा विचार करा.
दहशतवाद विरोधी दिन हिंदुस्थानातील लोकांचे रक्षण करण्यासाठी दहशतवादाविरुद्ध लढलेल्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. दहशतवादाविरुद्ध लढताना मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर देशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण सर्वांनी देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ घेऊ या. सतर्क राहून हे हल्ले करणाऱ्या अमानवीय लोकांवर नजर ठेवून देशाची सुरक्षा सर्वप्रथम हा विचार डोक्यात ठेवून छत्रपती शिवरायांच्या मावळय़ांसारखे लढणे जरुरी आहे.
[email protected]


























































