क्रिकेट-आर्किटेक्चर-पुन्हा क्रिकेटर, ‘टीम इंडिया’त निवड झालेल्या वरुण चक्रवर्तीची अजब कहाणी

‘मी 2018 मध्ये फिरकी गोलंदाजीला सुरुवात केली. तमीळनाडू प्रीमियर लीगमधील कामगिरीने माझ्या आयुष्याला खऱया अर्थाने कलाटणी मिळाली, मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास थेट ‘टीम इंडिया’त निवड होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.’

नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) – वयाच्या 13 व्या वर्षापासून ते 17 व्या वर्षांपर्यंत क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने डावलले गेल्याने क्रिकेटला बायबाय करून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. पाच वर्षांचा आर्पिटेक्चरचा कोर्स केला. काही दिवस नोकरी केल्यानंतर पुन्हा क्रिकेटकडे वळून वयाच्या 29 व्या वर्षी थेट ‘टीम इंडिया’त निवड झाली. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी प्रेरणादायी स्टोरी आहे कर्नाटकचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची.

ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी ‘बीसीसीआय’ने सोमवारी ‘टीम इंडिया’ची निवड केली. फक्त एक प्रथम श्रेणी सामना आणि केवळ 12 टी-20 सामने खेळलेल्या वरुण चक्रवर्तीची हिंदुस्थानच्या टी-20 संघात निवड झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या, मात्र कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना एकाच सामन्यात 5 बळी टिपण्याचा पराक्रम केलेल्या या लेगब्रेक गुगली गोलंदाजाची ‘बीसीसीआय’ने दखल घेतली. चक्रवर्तीने यंदाच्या आयपीएलमध्ये 11 सामन्यांत 13 फलंदाज बाद केले आहेत. आपण ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, पॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन व यॉर्पर असे 7 प्रकारचे चेंडू टापू शकतो असा दावा या गोलंदाजाने केला आहे.

कोलकात्याने मोजले 8 कोटी

वरुण चक्रवर्तीने 2018 मध्ये तामीळनाडू प्रीमियर लीगमधून व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. या स्पर्धेत आपल्या मदुरै पँथर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात चक्रवर्तीने मोलाची कामगिरी केली होती. गतवर्षी पिंग्ज इलेव्हन पंजाबने 20 लाख बेस प्राईज असलेल्या या गोलंदाजाला 8.4 कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केले. त्यावेळी त्याला फक्त एकाच सामन्यात संधी मिळाली. 2020 साठी पंजाबने चक्रवर्तीला रिलीज केले. मात्र गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने या फिरकीपटूसाठी 8 कोटी रुपये मोजले.

240 पैकी 125 चेंडू टाकले होते निर्धाव

आर्पिटेक्चरचा कोर्स पूर्ण केल्यानंतर वरुण चक्रवर्तींने हौसेसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. एका क्रिकेट क्लबकडून खेळताना दुखापत झाल्याने चक्रवर्तीने वेगवान गोलंदाजी सोडून फिरकी गोलंदाजी करायला लागला. तामीळनाडू प्रीमियर लीगमध्ये 240 पैकी विक्रमी 125 चेंडू निर्धाव टापून या फिरकी गोलंदाजाने तामीळनाडूच्या संघनिवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले. मग रणजीतील पंजूष गोलंदाजीच्या (9 सामन्यांत 4.23 च्या सरासरीने 22 बळी) बळावर वरुणला ‘आयपीएल’मध्ये संधी मिळाली. गतवर्षी फारशी संधी न मिळालेल्या या गोलंदाजाने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करून ‘बीसीसीआय’च्याही संघनिवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी निवडण्यात आलेला हिंदुस्थानी चमू

हिंदुस्थानचा टी-20 चमू

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.

हिंदुस्थान वन डे चमू

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, मयांक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

हिंदुस्थानचा कसोटी चमू

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (यष्टिरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रवी अश्विन, मोहम्मद सिराज.

हिंदुस्थानी संघासोबत असणारे चार वेगवान गोलंदाज

कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, एन. नटराजन.

आपली प्रतिक्रिया द्या