
मुंबई दूरदर्शन 2 ऑक्टोबर 1972 रोजी सुरू झाले. दूरदर्शनवर खास शेतकऱयांसाठी ‘आमची माती आमची माणसं ’ हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1973 पासून सुरू झाला.
शेतकरी बांधवांना मार्गदर्शनपर असा सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम म्हणजे ‘आमची माती आमची माणसं’. या कार्यक्रमातून शेतकऱयांचे उत्पादन वाढावे, यादृष्टीने मार्गदर्शन मिळते. सरकारी योजनांचीही माहिती दिली जाते. या लोकप्रिय कार्यक्रमाला 2 ऑक्टोबर रोजी 50 वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने रविवारी पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, संपादक आदिनाथ चव्हाण, संदीप सूद तसेच एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी. पी. सिंग उपस्थित होते.
कार्यक्रमात केकऐवजी शेतकऱयांनी पिकवलेले, मातीत उगवलेलं फळ म्हणजे पपई कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे कॅमेरामॅन, साऊंड रेकार्ंडग, लाइटिंग असिस्टंट एडिटर, ग्राफिक आर्टिस्ट, निवेदक इत्यादींचा गौरव करण्यात आला. जुन्या पिढीतील सहकारी वेगवेगळ्या ठिकाणांवरून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.



























































