
>> विलास पंढरी
प्रसन्न वातावरण असलेल्या गुलाबी थंडीत वसंत ऋतू व वसंत पंचमी येते. योगायोगाने व्हॅलेंटाईन डेही याच सुमारास येतो, पण आपल्या परंपरा आपण विसरत चाललोय आणि मार्पेटिंगचा जमाना असल्याने वसंत पंचमी कधीच मागे पडली असून व्हॅलेंटाईन डे मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. खरे तर वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाईन डे यातील चांगले तेवढे घेऊन हे दोन्ही दिवस साजरे करायला हरकत नाही.
विविध डे साजरे करण्याचे मार्पेटिंग पाश्चिमात्य जेवढे करू शकले तेवढे आपण करू शकलो नाही. वसंत पंचमी हा व्हॅलेंटाईन डेसारखाच प्रेम व्यक्त करण्याचा पुरातन उत्सव, पण सगळे जुने आपण विसरत चाललो असल्याने प्रेमाचे काहीसे बाजारीकरण करणाऱया व्हॅलेंटाईन डेला जास्त महत्त्व आले.
वसंत पंचमी हा हिंदुस्थानी व्हॅलेंटाईन डे असे म्हणण्याला हरकत नाही. वसंत पंचमीला विठ्ठल- रखुमाईचे लग्न झाले असेही भक्त मानतात. त्यामुळे पंढरपुरात वसंत पंचमीला हा देवाचा लग्नसोहळा साजराही केला जातो. पांढऱया शुभ्र पोषाखात अलंकारांनी नटलेला विठोबा आणि सालंकृत रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत लग्न लावले जाते. देशातल्या काही भागांत वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याचीही पद्धत आहे. हिंदुस्थानी संस्पृतीत प्रेमाचे वेगळे महत्त्व आहे. हा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. हिंदुस्थानात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. म्हणून हा हिंदुस्थानींचा व्हॅलेंटाईन डेच आहे.
कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला मदनोत्सव असे म्हटले जात असे. वसंत पंचमीच्या दिवशी मदनदेवता म्हणजे कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. आपल्या शरीराची व रतिक्रीडेची पूजा केली जात असे. रस, भाव, शृंगार यांचा हा उत्सव होता असे उल्लेख मृच्छकटिक आणि कालिदासाच्या मालविकाग्निमित्र या संस्पृत नाटकात आढळतात. राजे-महाराजे आपल्या राजवाडय़ात मदनोत्सव या दिवशी साजरा करीत असत असे उल्लेखही आढळतात.
बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचे रूप आहे. या दिवशी मुले-मुली एकमेकांना प्रपोज करतात.पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी आजही सरस्वतीची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी नेसत. हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपराही इथे जुनी आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत लोक हा प्रेमाचा पारंपरिक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’सारखाच साजरा करू लागले आहेत. आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर वेळ घालवतात. प्रसन्न वातावरण असलेल्या गुलाबी थंडीत वसंत ऋतू व वसंत पंचमी येते. योगायोगाने व्हॅलेंटाईन डेही याच सुमारास येतो, पण आपल्या परंपरा आपण विसरत चाललोय आणि मार्पेटिंगचे जमाना असल्याने वसंत पंचमी कधीच मागे पडली असून व्हॅलेंटाईन डे मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. ‘नूतन वर्ष दिन’ म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो तसेच काहीसे व्हॅलेंटाईन डेचेही आहे.
विशेष म्हणजे पाश्चात्य संस्पृतीतील हा दिवस हिंदुस्थानात तरुणाईचा एक आवडता दिवस झाला आहेच, पण हल्ली पूर्ण आठवडाभर साजरा करण्याची पद्धत रुजली आहे. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवडय़ात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाइन डे म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या आठवडय़ातील सर्वांत महत्त्वाचा दिवस 14 फेब्रुवारी! आपला वसंत पंचमी हा दिवस व्हॅलेंटाईन डेपेक्षाही सरस असून तो का साजरा केला जात नाही? खरे तर वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाईन डे यातील चांगले तेवढे घेऊन हे दोन्ही दिवस साजरे करायला हरकत नाही. आपण योग दिवस आंतरराष्ट्रीय केला तसेच वसंत पंचमीबाबत लक्ष घालायला हवे.




























































