ठसा : डॉ. म. सु. पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत गौतम

राठीतील थोर क्रतस्थ  लेखक, व्यासंगी समीक्षक प्रा. डॉ. म. सु. पाटील यांना ‘सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध’ या मौज प्रकाशित ग्रंथासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयुष्यभर क्रतस्थपणे काव्यविषयक समीक्षा लेखन करीत त्यांनी अनेक पिढय़ा घडवल्या. ‘सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध’ हा चिंतनशील ग्रंथ मौज प्रकाशन संस्थेने 18 एप्रिल 2013 साली प्रकाशित केला. त्यात प्रा. पाटील यांनी कला निर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा यासारख्या अनेक पैलूंचा या ग्रंथात मानसशास्त्र्ााrय अंगाने मागोवा घेतला आहे. सर्जन शक्तीचे विकसन कस कसे होते याचा त्यांनी  तर धांडोळा घेतला, पण त्याचसोबत विचार, तत्त्वज्ञान, सौंदर्य आणि कालमीमांसा हे वेचक कवी आणि कविता यांच्या उदाहरणातून मौलिकपणे मांडले आहे. अशा उदाहरणातून पाटील अभिजात आणि रोमँटिक काव्य विचारांशी असलेले नाते सूक्ष्मपणे उलगडून दाखवतात. ही व्याप्ती एवढी मोठी आहे की ती थेट विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवींपर्यंत येऊन थांबते. ही व्याप्ती नवकवींच्या काही वास्तवनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ कवितांपर्यंतही जाते. मधुकर पाटील यांना साहित्य अकादमीचा सन्मान वयाच्या 88 व्या वर्षी प्राप्त झाला आहे. ‘साहित्य क्षेत्रातील हा प्रतिष्ठsचा सन्मान मिळण्यासाठी तसा उशीरच झाला’ या शब्दात म. सु. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी व स्वाभाविकच आहे. ते म्हणतात, साहित्यक्षेत्रात सध्या होणारे लिखाण काळानुरूप  आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. अजूनही साहित्यातील लिखाण साठीच्या दशकात असल्यासारखेच वाटते. ते वाचून समाधान होत नाही. साहित्यातील लेखनात बुद्धिनिष्ठतेचे प्रतिबिंब दिसते, आज माणसामाणसांमधील संवाद कमी झाला असल्याने ताकदीचे लेखन होत नाही, अशी खंत प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या विधानाशी दुमत असण्याचे कारण नाही. या समीक्षा संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार लाभला आहे. ते प्रा. पाटील यांच्या पीएच.डी.वर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी 2004 मध्ये ‘तुकारामः अंतर्बाहय़ संघर्षाची  अनुभव रूपे आणि 2006 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ज्ञानेश्वरीचा  काव्यानुबंध) यासारखी महत्त्वाची ग्रंथसंपदा मुंबईच्या शाब्दल प्रकाशनाने प्रकाशित केली. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास करताना कोणता काव्यविचार उपयुक्त ठरेल, याचा पाटील यांनी अभ्यासपूर्व शोध घेतला तेव्हा तिसऱ्या ‘सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध’ या ग्रंथाची निर्मिती झाली, ज्याची मौज या प्रकाशन संस्थेने पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि आज याच संग्रहाचा साहित्य अकादमी या साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान झाला. या पुस्तकात पाटील यांनी भरतमुनी आणि प्लेटो ऑरिस्टॉटल यांच्यापासून गत शतकाच्या साठ-सत्तरच्या दशकापर्यंत आलेल्या काव्यविषयक विचारांचा साक्षेपी दृष्टीतून आणि साहित्यविषयक व्यासंग नि चिंतनातून वेध घेतला आहे. एकूण सात प्रकरणांमधून सर्जनाच्या प्रेरणा, कविमन, काव्यात्म अनुभव हे प्रा. पाटील यांनी अत्यंत रसाळपणे मांडले आहे. सत्तरच्या दशकात प्रबंध लेखन पूर्ण झाल्यानंतर पा. पाटील यांनी स्वतःला अपडेट करून घेतले. काळानुरूप ते अद्ययावत होत  राहील. त्यामुळे झालेल्या चिंतनातून नवीन वाचन, नवीन आकलन याचे प्रतिबिंब व्यक्त झाले. रूप-आशय यात भिन्नता नसली तरी आशय रूपाचं स्वरूप ठरवत असतो, त्या दृष्टीने काव्यरसिक, जाणकार अभ्यासकांना काव्यविषयक सौंदर्य  उलगडून दाखवत  असताना त्या दोन्हींचा विचार झाला पाहिजे. हे करीत असताना समीक्षेस कोणतीही चौकट असू नये, असे प्रा. पाटील यांना वाटते. अलिबाग जिल्हय़ात 1931 साली जन्म झालेल्या मधुकररावांचे जीवन खारेपाटातील प्रदेशात घडले, शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या काम करून शेतकरी कुटुंबात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली. त्या वेळेस असणारी व्हर्नाक्युलर ही परीक्षा कुलाबा जिल्हय़ातून पहिल्या क्रमांकाने त्यांनी उत्तीर्ण केली. वडील गिरणी कामगार होते. मधूला गिरणीत कामाला घालून रात्रशाळेतही घातले, अशा शाळेतील मॅट्रिक परीक्षा त्यांनी गुणवत्तेने प्राप्त केली व कुलाबा विभागात पहिले आले. शिक्षण समाप्तीनंतर प्रा. पाटील मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक व नंतर 1969 ते 1969 या काळापर्यंत प्राचार्यपदही  भूषवले. साहित्य लेखनाचा वारसा त्यांच्या कन्या तथा आजच्या आघाडीच्या प्रतिभावंत कवयित्री नीरजा या जोपासत आहेत. म. सु. पाटील यांच्या पत्नी विभावरी यांनी संकलित केलेल्या आगरी लोकगीतांचे संकलन उत्तम केले आहे. प्रा. पाटील यांना मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा साहित्य प्रवास पुन्हा एकदा  अधोरेखित झाला आहे. सन्मान उशिरा मिळत असला तरी तो योग्य व्यक्तीसच मिळाला आहे.