अरविंद केजरीवाल, के कविता तुरुंगातच राहणार; कोठडी 14 दिवसांनी वाढवली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाच्या खासदार के कविता यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कथित मद्य धोरण घोटाळ्यात – यांना 14 दिवसांसाठी वाढीव न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि भारत राष्ट्र समितीचे नेते – दोघेही दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. या दोघांना पुढील 7 मे रोजी कोर्टात हजर केलं जाईल.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे, ज्यामध्ये त्यांनी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने 21 मार्च रोजी केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे. न्यायालयाने 15 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी केली, परंतु केंद्रीय तपास यंत्रणेच्या उत्तरापर्यंत केजरीवाल यांना तात्काळ दिलासा देण्याचं नाकारलं.

काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती, ईडीनं आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी पुरेसे पुरावे दाखल केली होते – असं नमूद केलं होतं की केजरीवाल हे आता रद्द करण्यात आलेल्या धोरण तयार करण्यात आणि निधी देण्यासाठी ₹ 100 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे.