राम हमारे लिए प्यार है, आपके लिए व्यापार आहे; अरविंद सावंत यांनी भाजपला फटकारले

अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन होत आहे. देशात सध्या फक्त याच सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या उद्घाटन सोहळ्यावरून देशभरात सध्या आमंत्रणं दिली जात आहे. भाजप तर हा सोहळा त्यांचाच असल्याच्या अविर्भावात वागत आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार अऱविंद सावंत यांनी भाजपला फटकारले आहे.

”राम मंदिराबाबत जे आता तोंड वर करून बोलतायत ना ते तिथे गेलेही नव्हते. आमचे शिवसैनिक गेले होते. बाबरी पाडली त्यानंतर भाजप ज्या प्रकारे वागली. ते बघितलंय सगळ्यांनी. भंडारीजी म्हणाले आम्ही काही केलेलं नाही शिवसैनिकांनी केलेले. त्यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असले तर मला त्यांचा अभिमान आहे. असे जाहीररित्या बोलणारे बाळासाहेब होते व रणमैदानातून पळाले ते भाजपवाले होते, असा सणसणीत टोला अरविंद सावंत यांनी भाजपला लगावला.

”मंदिर बनविण्यासाठी बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे सतत प्रश्न करत होते. मंदिर कधी बनवणार, असा सवाल आम्ही सोबत राहून करत होतो. कायद्याने राम मंदिर बनवले गेले पाहिजे असे आमचे म्हणने होते. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिलाय. भाजपने हे मंदिर नाही बनवले. आता तुम्ही कब्जा करू पाहत आहात. तिथे ट्रस्ट कशाला आहे. ज्यांचे राम मंदिरात काहीही श्रेय नाही ते आता श्रेय घेऊ पाहत आहेत. राम हमारे लिए प्यार है, आपके लिए व्यापार आहे , अशी टीका सावंत यांनी केली.

”भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, देशाची सुरक्षा, देशासाठी बलिदान देणे हेच आमचे हिंदुत्व आहे. बाळासाहेब म्हणायचे मंदिरात घंटा बडवणारे हिंदुत्व आम्हाला अपेक्षित नाही. दशतवाद्यांसोबत लढा देणारा मला अपेक्षित आहे,. कश्मीरा हल्ले होत होते, आताही होत आहेत. तुम्ही 370 कलम काढले. पण तिथे शांतता कुठे आहे. आणि तुम्ही घंटा बडवत बसला आहात. हाच फरक आहे तुमच्या व बाळासाहेबांच्या विचारात.”, असा टोला सावंत यांनी लगावला.