बा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे

115

सामना ऑनलाईन, पंढरपूर

राज्यात चांगला पाऊस पडू दे. दुष्काळाचे सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्याचे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण (मु.पो. सांगवी सुनेगाव तांडा, जि. लातूर) या दांपत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिराच्या सभामंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या