अशोक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर

ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रावरंभा’चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे, कलाकार कोण आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात असताना स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे.

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ ‘निधडय़ा छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते’ अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेले दिसत आहेत.