
चरईतील श्री मावळी मंडळाच्या 73 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱया दिवशी चढाया-पकडींच्या खेळाचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. महिलांमध्ये ओम् वर्तकनगरने चौथी फेरी गाठत वर्चस्व सिद्ध केले, तर पुरुषांमध्ये अश्वमेघ स्पोर्ट्सने 5-5 चढायांच्या नटय़मय लढतीत चौथी फेरी गाठली.
ठाण्यातील कबड्डीचे माहेरघर असलेल्या मावळी मंडळाच्या प्रतिष्ठsच्या स्पर्धेच्या पुरुष गटात अश्वमेघने बाळ गोपाळ मंडळावर 33-32 (7-6) असा थरारक विजय मिळवला. पूर्वार्धात पिछाडीवर असलेल्या अश्वमेघने 26-26 अशी बरोबरी साधत सामना 5-5 चढायांपर्यंत नेला. निर्णायक क्षणी आदित्य पांडेने एका चढाईत 3 गडी टिपत विजयावर शिक्कामोर्तब केले. गणेश रणनवरे, हर्षल शिंदे आणि शुभम पांडे यांनी मोलाची साथ दिली. दुसऱया सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने पिछाडीतून जोरदार पुनरागमन करत गुड मार्ंनग स्पोर्ट्सवर 37-27 अशी मात केली.




























































