
आसाम राज्य सरकारतर्फे लवकरच येथील सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या नोव्हेंबरपासून या संस्कृत शाळा आणि मदरसे बंद करण्यात येणार असून लवकरच त्याची अधिसूचना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आसामचे शिक्षण आणि अर्थमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी दिली. भाजप सरकारच्या या निर्णयाबद्दल याठिकाणी नवा वादंग उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना शिक्षणमंत्री हिमांता बिस्व सरमा म्हणाल्या की, सरकार सार्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र शिकविण्यासाठी करु शकत नाही. आम्ही विधासनभेत या धोरणाबाबत माहिती दिली होती. त्यानुसार लवकरच याबद्दल अधिसूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर मदरसे बंद झाल्यानंतर 48 कंत्राटी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये समावून घेतले जाणार आहे. खासगी तत्वावर संस्कृत शाळा आणि मदरसे चालविण्याबाबत सरकारचे काहीही म्हणणं नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.





























































