
आसाम राज्यात मुस्लीम बहुपत्नित्वावर बंदी आणण्यात आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी घेतला असू त्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती संविधानाच्या कलम 25 नुसार राज्यवार सिद्धांत आणि मुस्लीम पर्सनल लॉ अधिनियम 1937 मधील तरतुदींवर विचार विनिमय करणार आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.
मंगळवारी आसाममध्ये होणाऱ्या बालविवाहावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. हिंदुस्थानात मुस्लीम समुदाय वगळता जवळपास सर्व धर्मांमध्ये बहुपत्नीत्वावर बंदी आहे. हिंदुस्थान हा अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभाग नोंदवत असतो.
नागरिक आणि राजकीय अधिकारांच्या कक्षेच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र समितीचाही एक भाग आहे. त्यात महिलांविरोधातील सर्व प्रकारचे भेदभाव संपवण्याबाबत चर्चा होत असतात. बहुपत्नीत्व ही प्रथा महिलांच्या आत्मसन्मानासाठी एक खूप मोठी ठेच आहे आणि त्यामुळे जिथे बहुपत्नित्व अस्तित्वात असेल ती प्रथा संपुष्टात आणली पाहिजे, असं शर्मा यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.



























































