
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिले असताना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र हा निर्णय निश्चित कालमर्यादेत घेणे अशक्य असून अपात्र करायचे की नाही हे ठरवावे लागेल असे म्हटले आहे.
राहुल नार्वेकर सध्या लंडनमध्ये आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत त्यांनी थेट लंडनहून एका वृत्तवाहिनीशी फोनवर संपर्क साधला. ते म्हणाले, ‘आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे अशक्य आहे. माझ्यासमोर अनेक अर्ज आहेत. यात व्हिप कोणत्या राजकीय पक्षाने बजावायचा यावर अधिक स्पष्टता यायची आहे, असे विधानही त्यांनी केले.
























































