वाढदिवसालाच काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास तानाजीनगर इथल्या शिवाजी उदय मंडपाजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी लोंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी लोंढे यांचा वाढदिवस होता. ते त्यांच्या कामासाठी चिंचवडला गेले होते. तानाजीनगर भागात त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना गाडीतून खेचून बाहेर काढण्यात आले. आकाश घोलप, सुमीत लवे आणि गणेश घोलप यांनी यावेळी आपल्यावर धारदार शस्त्राने वार केले असे लोंढे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे. हे तिघेही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.