धक्कादायक! लातुरात दलिताच्या घराचे दार मंदिरासमोर नको म्हणून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । वाढवणा बु. (लातूर)

वाढवणा बु. येथून जवळच असलेल्या उमरगा मन्ना गावात पोलीस पाटलासह वीस जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विनायक अर्जुन कांबळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिमन्यू कांबळे यांच्या घराचे तोंड व अर्जुन कांबळे यांचे घराचे तोंड मंदिराकडे नको म्हणून यांच्या घरासमोर हौद बांधुन सिमेंट रस्त्याचा मलबा टाकला. हा मलबा हटवण्यास सांगितला असता जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी गावचा पाटील पांडुरंग तुळशीराम बिराजदार, प्रमोद संभाजी हल्लाळे, हौस पाटील, प्रभु मोरे, ज्ञानेश्वर मोरे, रवी मोरे, एकनाथ हल्लाळे, बालाजी मोरे, विनोद संभाजी हल्लाळे, दशरथ प्रभाकर मोरे, रामेश्वर शेंगदाळकर, ज्ञानेश्वर वाडकर, संभाजी हल्लाळे, किसन मोरे, प्रभु गणपती मोरे, राधाबाई मोरे, शांता बाई मोरे, सुमनबाई मोरे, उमाबाई मोरे, वंदाबाई हल्लाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रमाणे अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लहान मुलीला मारहाण केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अहमदपूर अश्विनी पाटील करीत आहेत.