बेस्ट कोकण शॉर्टफिल्म म्हणून ‘आतुरता’ शॉर्टफिल्मचा गौरव!

मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल स्पर्धेत कुडाळच्या चिमणी पाखरं आणि शेखर सातोसकर फोटोग्राफी प्रस्तुत ‘आतुरता’ या शॉर्टफिल्मला बेस्ट कोकण शॉर्टफिल्म म्हणून तर ‘उमेद’ शॉर्टफिल्मला बेस्ट डिप्रेशन शॉर्टफिल्म म्हणून गौरविण्यात आले आहे.

यावेळी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते संपूर्ण चिमणी पाखरं टीमला नुकतेच गौरविण्यात आले आहे. या दोन्ही शॉर्टफिल्मची निर्मिती चिमणी पाखरं कुडाळ यांनी केली असून चिमणी पाखर चे संस्थापक रवि कुडाळकर, निर्माता कौसर खान आणि अविनाश मर्तल यांचे विशेष योगदान यामध्ये आहे. ‘आतुरता’ हा एक सामाजिक लघुपट असून गणपती उत्सवामध्ये गावा गावात चालणारे चुकीच्या चाली रीती परंपरा यावर प्रकाश टाकणारा लघुपट आहे.
‘उमेद’ हा लघुपट आत्ताच्या पालकांनी प्रत्येक मुला मुलींना सोबत घेऊन दाखवावा असा एक सामाजिक लघुपट आहे. वाढते टेन्शन आणि त्यामधून आईवडील आणि आपल्या घरातील माणसं यांना विचारात न घेता घेतले जाणारे चुकीचे निर्णय, यावर प्रकाश टाकणारा हा एक सुंदर लघुपट आहे.

‘आतुरता’ या शॉर्टफिल्म मध्ये सिंधुदुर्गातील कुमारी दिक्षा नाईक आणि मिली मिश्रा, निलेश गुरव, उपेंद्र पवार, वेदांत वेंगुर्लेकर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.सोबत निखिल कुडाळकर, संचिता कोलापटे, अभिषेक पवार,आर्यन चव्हाण, साहिल सिंग, सुजय जाधव, सतीश पावसकर, दुर्वा पावसकर, भावेश यांनी सह कलाकार म्हणून काम केलं आहे. उमेद या शॉर्टफिल्म मध्ये मिली मिश्रा साक्षी मांजरेकर आणि वेदांत वेंगुर्लेकर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.सोबत सुजय जाधव नुपूर नांदोसकर यांनी सहकलाकार म्हणून काम केलं आहे.या शॉर्टफिल्मचे छायांकन शेखर सातोसकर आणि अजय कुडाळकर यांनी केले आहे.संकलन कुमार निखिल कुडाळकर याने केले आहे.कलाविभाग चिमणी पाखरंची पूर्ण टीम आणि कुमारी संजना पवार यांचे सहकार्य लाभले.