अबब! कारची खिडकी उघडी ठेवल्याने ठोठावला 5 हजारांचा दंड

देशभरात नुकतेच लागू झालेल्या वाहन सुधारणा कायद्यानंतर वाहतूक पोलिसांनी एकेकाचे चालान कापण्यास सुरुवात केली. त्यावरून देशभरात मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अशातच सिडनीत एक चालान कापण्यात आले आहे. याची किंमत ऐकून हिंदुस्थानात होत असलेली कारवाई काहीच नाही, असे प्रत्येकाला वाटू शकते. येथील एका जोडप्याने घराबाहेर वाहन उभे करून कारची खडकी उघडी ठेवल्याबद्दल त्यांना तब्बल 5,869 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काय वाचून थक्क झालात ना? मात्र हो हे खरे आहे.

सिडनीतील कॅरिंगबाह येथे राहत असलेल्या या जोडप्याला कारची खिडकी उघडी ठेवल्याबद्दल 112 ऑस्ट्रेलियन डॉलर ( 5,869 रुपये ) इतका दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल सांगताना महिलेने फेसबुकवर लिहिलं आहे की, कारच्या खिडक्या बंद न केल्याबद्दल आम्हाला 112 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. आमच्या घरासोबत आमची कार उभी होती. हा गुन्हा आहे हे मला माहित नव्हते. या दंडापासून वाचण्यासाठी तुम्ही आपल्या कारच्या खिडक्या बंद ठेवा.’

दरम्यान, एनएसडब्ल्यू मधील रस्ते नियमांनुसार जर तुम्ही तुमची वाहने रस्त्यावर असुरक्षित सोडली, तर दंड स्वरूपात तुमचा चालान कापला जाऊ शकतो. तसेच वाहन चालक वाहनापासून तीन मीटरपेक्षा जास्त अंतरावर असेल, तर त्याने वाहनाच्या खिडक्या बंद केल्या पाहिजेत आणि दरवाजे लॉक केले पाहिजेत. असे न केल्यास येथील नियमांनुसार तुमचा चालान कापला जाऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या