
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामजन्मभूमी अयोध्येतही भव्य दीपोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. या दीपोत्सवात देश-विदेशातील भक्तांना आता व्हर्च्युअल हजेरी लावता येणार आहे.भाविकांना घरबसल्या या दीपोत्सवात सहभागी होता यावे यासाठी योगी सरकार अधिपृत वेबसाईट लाँच करणार आहे. या वेबसाईटवरून भाविकांना व्हर्च्युअल दीपप्रज्वलनही करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दीपोत्सवात व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत.
तब्बल 492 वर्षांनंतर अयोध्येत पहिल्यांदाच भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर आता राममंदिर बांधण्यास सुरुवात झाल्याने अयोध्येतील यंदाची दिवाळी खास असणार आहे. अधिकाधिक भाविकांना या दीपोत्सवात भाग घेता यावा यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश सरकारने ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे.
खराखुरा अनुभव मिळणार
ऑनलाईन पोर्टलवर भाविकांना अगदी खराखुरा अनुभव मिळणार आहे. पोर्टलवर भगवान श्रीरामाचा पह्टो झळकेल. ज्याच्यासमोर भाविकांना दीपप्रज्वलन करता येईल. भाविकांना आपल्या श्रद्धेनुसार माती, तांबा, स्टील अथवा अन्य धातूंपासून बनवलेले दीप स्टॅण्ड तसेच घी, राईचे तेल किंवा तीळाचे तेलदेखील निवडता येईल. 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित मुख्य सोहळा पार पडणार आहे. रामजन्भूमी परिसरातील दीपोत्सवात यंदा साडेपाच लाख मातीचे दिवे लावण्यात येणार आहेत.




























































