सुंता करताना बालक गंभीर जखमी, इलाजासाठी दीड लाख खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

केरळमध्ये एका लहान बाळाची सुंता करताना डॉक्टराच्या बेपर्वाईमुळे बाळ गंभीर जखमी झाले आहे. केरळच्या मानवाधिकाराने या घटनेची दखल घेत बाळाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

केरळमध्ये एका 23 दिवसांच्या मुलाची सुंता करायची होती. तिथल्या डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्राचा तीन वर्षाचा अनुभव होता. त्याने सुंता करताना गंभीर चूक केली आणि बाळाचे गुप्तांग 75 टक्के कापले गेले. त्यानंतर यावर इलाजासाठी दीड लाखांचा खर्च अपेक्षित आहे. केरळच्या मानवाधिकाराने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बाळाच्या कुटुबीयांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या इस्पितळात बाळाची सुंता झाली त्या इस्पितळात सोयी सुविधांचाही मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने इस्पितळाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.