कारची काच फोडून व्यापार्‍याचे साडे चार लाख रुपये बॅगेसह लंपास, जालन्यातील बदनापूर शहरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्याील बदनापुर तालुक्यातील बाजार वाहेगांव येथील कापसाचे व्यापारी नामदेव उत्तमराव काळे हे आज 28 एप्रिल रोजी कामानिमित्त कार क्र (एमएच-21-बीक्यु-0588) घेऊन बदनापुर येथे आले होते. त्यांनी आपली कार जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्ग बदनापुर शहरातील गुरुदेव कलेक्शन समोर उभी करून बनियान घेण्यासाठी कापड दुकानात गेले हया संधिचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेली 4 लाख 51 हजार 600 रुपयांची बॅग लंपास केली.

काळे यांनी दुकानातुन बाहेर येऊन बघितले असता त्याना आपल्या कारची काच फुटलेली दिसली असता त्यांनी कारमध्ये ठेवलेली पैशाची बॅग गायब झाल्याची दिसली. घटनेची माहिती पोलीसाना मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्याची टिम घटनास्थळी दाखल झाली व गुरुदेव कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व नंतर बँक ऑफ महाराष्ट्रचेही सीसीटीव्ही फुटेज तपासले. कापसाचे व्यापारी यांनी पोलीसात येऊन फिर्याद दिली असता कलम 379 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पो. हे.कॉ. मान्टे हे करीत आहेत.