जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रावेर

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावेर येथील शेतकऱ्यांशी केलेल्या गैरवर्तनाचा निषेध म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाजन यांच्या जळगावातील कार्यालयावर केळी फेको आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. यामुळे केळयासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे रावेर तालुक्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करणाऱ्या काही चित्रफिती व्हायरल करण्यात आल्या होत्या. महाजन यांच्या वर्तनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी १९ रोजी राष्ट्रवादीतर्फे केळी फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच जुंपली होती.