
बांगलादेशने पहिल्याच वन डे सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 284 धावांचा डोंगर रचला आणि तिथेच त्यांनी विजयाचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 191 धावा करता आल्या. त्यामुळे बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर डकवर्थ-लुईस नियमानुसार 86 धावांनी विजय साकारला. बांगलादेशचा मोसादेज हुसेन हा ‘सामनावीर’ ठरला, त्याने नाबाद 86 धावा फटकावल्या आणि दोन विकेटही मिळवले. हा सामना चर्चेत आला तो दोन्ही संघांतील खेळाडूंनी मैदानात घातलेल्या राडय़ामुळे. मैदानात जोस आणि नाहिद राणा यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. अखेर शांतो होसेनने मध्यस्थी करत हा राडा थांबवला.

























































