
बांगलादेश येथे सोमवारी एक प्रवासी रेल्वे आणि एका मालगाडीत टक्कर झाल्याने दुर्घटना घडली आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला.
चटोग्राम स्थानकाच्या दिशेने जाणआऱ्या मालगाडीची टक्कर एगारो सिंदूर एक्सप्रेस या प्रवासी रेल्वेशी झाली. या अपघातात आतापर्यंत 15 जण दगावले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केलं आहे. अपघातग्रस्त डब्यांखाली काही प्रवासी दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दुर्घटनेत 100हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. क्रेनच्या साहाय्याने प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसंच, स्थानिक रहिवासीही मदतकार्यासाठी पुढे आले आहेत.
























































