बांगलादेशी मायलेकींना खार पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात 28 वर्षांपासून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी मायलेकींना खार पोलिसांनी अटक केली. आसमा शेख आणि आयशा शेख अशी त्या दोघींची नावे आहेत. खार परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर खार पोलिसांनी स्थानक परिसरात सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्या मायलेकींकडे कोणतेही कागदपत्रे नव्हते. 28 वर्षांपूर्वी आसमा ही बांगलादेश येथून हिंदुस्थानात आली होती. त्या दोघी वसई येथे राहत होत्या.