
बारसूमधील रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने शुक्रवारी उग्र रुप धारण केले. इथले आंदोलन शुक्रवारी सर्वेक्षण सुरू असलेल्या जागेत घुसले. त्यांना आवरताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. इथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडला, मात्र तरीही आंदोलक पांगले नाहीत. या सगळ्या धावपळीचा आणि तीव्र उन्हाचा आंदोलकांना त्रास झाला असून काही आंदोलक हे भोवळ येऊन कोसळले. ऊन आणि धावपळीचा त्रास झाल्याने कोसळलेल्या आंदोलकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने आरोप केला की अश्रूधुराचा त्रास झाल्याने आंदोलक बेशुद्ध झाले आहेत.
सुपाऱ्या घेऊन प्रकल्प लादू पाहताय, पण ते होऊ देणार नाही!
ही कोकणातली जमीन आहे. तुम्हाला ठार मारायचं तर आम्हाला ठार मारा आणि काय करायचं ते करा, काही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही. इथे जो लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा केला ज्यामुळे नागरीक बेशुद्ध पडले त्याला पोलीस जबाबदार आहेत असा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने म्हटले.
View this post on Instagram
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार विनायक राऊत हे आज आंदोलकांची भेट घेणार होते. मात्र आंदोलकांपर्यंत पोलिसांनी राऊत यांना पोहचू दिलं नाही. विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आणि घटनास्थळावरून दूर नेलं. राऊत यांना आक्रमक झालेल्या आंदोलकांवर आणि पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “हे आंदोलन भाजपच्या भूमाफीयांसाठी, दलालांसाठी हे आंदोलन चिरडून टाकायचे आणि जमिनीचा मोबदला उकळायचा हा धंदा फडणवीस करताहेत. आज रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन सुरू असून पोलिसांच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांची डोकी फोडायची हा निर्दयीपणा हे मिंधे सरकार करतंय.”
बारसु रीफायनरी आंदोलनात मला व माझ्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. pic.twitter.com/aBmzA7OvAg
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) April 28, 2023
























































